जेएनएन, मुंबई. (Ladki Bahin Yojana): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राबवलेल्या "100 दिवस कृती आराखडा" उपक्रमात महिला व बालविकासांने केलेल्या कामाची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत अवघ्या 3 महिन्यांत 2.47 कोटी महिलांना थेट DBTद्वारे आर्थिक लाभ देण्यात आला आहे. 

आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला व बालविकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या "100 दिवस कृती आराखडा" उपक्रमात महिला व बालविकास विभागाने कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी, विभागाचे आधुनिकीकरण व लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत 80% गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. 

महत्वाच्या टप्प्यांवर एक नजर:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना- अवघ्या 3 महिन्यांत 2.47 कोटी महिलांना थेट DBTद्वारे आर्थिक लाभ.
  • 50 लाख महिलांचे आधार-सीडिंग करून योग्य लाभवितरण सुनिश्चित.
  • पोषण अभियान -
    * 2.45 कोटी लोकसहभागी उपक्रम, 41 हजार SAM बालकांवर उपचार. 37,000 सेविकांचे प्रशिक्षण, 3595 शहरी बालविकास केंद्रे (UCDC).
  • डिजिटल यश आणि पारदर्शक प्रशासन
    *E-Office प्रणालीचा 85% वापर, RTI व RTS अद्ययावत. 95% तक्रारी वेळेत निकाली.
  • महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता
    * 20 लाख महिलांना MAVIM व नवतेजस्विनी योजनेतून उद्योजकतेकडे वाटचाल.
    * Amazon, ONDC, GIZ यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी.
  • राज्य शासन व केंद्र शासन यामध्ये समन्वयाची प्रभावी अंमलबजावणी
    * विविध योजनांचे उद्दिष्ट 100 % पार, अन्न व पोषण, गृहभेटी, ग्रोथ मॉनिटरिंग यामध्ये संपूर्ण साध्यता.

हेही वाचा - Mahayuti Govt Report Card: फडणवीस सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर, कोणत्या मंत्र्यांचा विभाग कितव्या क्रमांक... वाचा सविस्तर

हा क्रमांक केवळ आकड्यांचा विजय नाही, तर ही आहे महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेची, प्रत्येक लाभार्थिनीची, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे, असं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. 

माझ्या सर्व सहकाऱ्यांना, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा प्रशासनाला, आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदय आणि महिला व बालविकास खात्याच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन अदिती तटकरे यांनी केलं आहे.