जेएनएन, मुंबई. Maharashtra Board 10th-12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2025 ची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान, घेण्यात आली होती. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत झाली होती. परीक्षा पार पडल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्याबाबतची तारीख आणि वेळ ही शिक्षण मंडळातर्फे लवकरच जाहीर होणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं. 

कधी लागणार दहावी-बारावीचा निकाल (When is 10th and 12th Result)

पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औंदुबर उकिरडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, इयत्ता बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उतत्रपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील 8 दिवसात गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल. त्यानंतर बारावीचा निकाल 13 किंवा 14 मे रोजी तर दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

निकाल कुठे पाहता येईल? (Websites for SSC and HSC Result 2025)

10 वी आणि 12 वीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खालील शासकीय किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट्सला भेट द्यावी लागेल.

    दहावी- बारावीचा निकाल पाहण्याच्या टीप्स (How to check HSC Board Result 2025)

    • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
    • त्यानंतर HSC Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर एक विंडोज ओपन होईल. त्यात विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव भरायचे आहे.
    • यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
    • सबमिट करताच विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दिसून येईल.
    • या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता तसेच तो डाऊनलोड करुन सेव्ह सुद्धा करु शकता.

    हेही वाचा - Maharashtra Education News: महाराष्ट्र शासनाचा शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार, मुलांना मिळणार मूल्याधारित शिक्षण