जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update Today. केंद्रीय हवामान विभागानुसार पुढील २४ तास देशासाठी महत्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांत महाराष्ट्र व शेजारील राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर अनेक जिल्ह्यांना पुराचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम-
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव येथे मुसळधार पावसाचा अंदाज असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकण व घाटमाथ्यावर वातावरण ढगाळ राहण्याची तसेच जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील काही भागांत पावसाची विश्रांती असणार आहे.
गुजरातमध्ये धोकादायक स्थिती-
नर्मदा, तापी, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात सतर्कतेचा इशारा -
धार, अलीराजपूर, बडवानी आणि इंदूर जिल्ह्यांमध्येही पावसामुळे पूर येण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानातही धोका!
धुंगरपूर व बंसवरा जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.