जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News: विदर्भ आणि मराठवाड्यासह मुळसधार पावसाने काल राज्याला झोडपले. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Maharashtra heavy rains Warning) आहे. काल पडलेल्या पावसाने राज्यातील तापमानमध्ये मोठी घट झाली आहे. आजही राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा अलर्ट

आज कोकणात आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासहर मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मुंबई हवामान केंद्रानं अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ सोडून सर्व जिल्ह्याना पावसाचा इशारा दिला आङे. यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव याठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

गारपीठीसह वादळी पावसाची शक्यता

    आज ही राज्यात अनेक ठिकाणी गारपीठीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याचा तापमानमध्ये अंशत: घट नोंद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    आजपासून दोन दिवस राज्यात पावसाचा इशारा

    6 मे च्या रात्रीपासून हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 7 मे ते 9 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल. पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे ही वर्तविला आहे. या दरम्यान राज्यात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मराठवाड्यात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता

    हवामान विभागाने प्राथमिक अंदाज वर्तविला आहे की. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये उन्हाची लाट कायम असतानाच मराठवाडा आणि नजीकच्या भागांमध्ये अचानक तापमानामध्ये घट झाली आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.