जेएनएन, मुंबई. Punyashlok Ahilya Devi Holkar Hostel Scheme: धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यात येणार आहेत.
नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह ही वस्तीगृह असणार आहेत. या वसतीगृहाची क्षमता ही प्रत्येकी 200 विद्यार्थ्यांची असणार आहे.. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे वसतीगृह असणार आहे.
नाशिक येथे वसतीगृहाचे काम सुरु असून पुणे, नागपूर येथे लवकरच वसतीगृह सुरु होणार आहे. या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यात येणार आहे.
यशवंत विद्यार्थी योजना काय?
दरम्यान, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. ‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार येणार आहे. या योजनेतून दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित केले आहेत. तर, राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना राबवण्यात येत आहे.