जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. मागील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. तर अनेक नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यातच आता हवामान विभागाने आणखी एक चिंताजनक बातमी दिली आहे.
हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. मुंबई- पुण्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात आज पावसाचा अलर्ट असलेली जिल्हे
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.