जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain Update: राज्यात मागील महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या तोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावला गेला आहे. यातच आता हवामान विभागाने आणखी एक चिंताजनक बातमी दिली आहे. दरम्यान,

पावसाचा अलर्ट जारी

हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. पुण्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी

  • 15 ऑक्टोबर - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली,  
  • 16 ऑक्टोबर - रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती,  बुलढाणा, गडचिरोली,  वाशिम, यवतमाळ

31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर 

काही दिवसांपूर्वी, राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये पिकांचे नुकसान, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान, मातीची धूप, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, दुष्काळी परिस्थितीत सामान्यतः देण्यात येणाऱ्या सवलती, रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च, सानुग्रह अनुदान, घरे, दुकाने आणि गोठ्यांचे नुकसान यांचा समावेश होता.