जेएनएन, मुंबई. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन भरणीच्या वेळी पावसाने दडी मारल्याने शेती मालाची वाईट परिस्थिती झाली आहे.
काहीसा दिलासा
आता काल अनेक भागात सरी कोसळल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस कोसळला आहे. आजही अनेक भागात IMD कडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज या भागात ऑरेंज अलर्ट (Maharashtra Weather Update IMD Reports)
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ परिसरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
तर धुळे, नंदुरबार, नाशिक घाट या भागात IMD Mumbai कडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत येलो अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज आहे. IMD कडून मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंशसेल्सि असे राहण्याची शक्यता IMD Mumbai ने व्यक्त केली आहे.
विमानतळ परिसरात साचले पाणी (Mumbai Rain Update)
मुंबईत मुसळधार पावसानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले.
