जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज
राज्यात उन्हाच्या कहिलीपासून नागरिकांना थोडाचा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यात विषेशतः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
तर सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितला आहे.
पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
16 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ.
17 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
18 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे,पुणे घाट, सातारा, सांगली, हिंगोली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
हेही वाचा- Gudi Padwa 2026: 19 मार्च रोजी गुढीपाडवा, वाचा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी…
19 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे,पुणे घाट, सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
20 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.

