जेएनएन, नवी दिली. Holiday on 19 March: महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात 19 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. कारण, महाराष्ट्रात 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उगादी हा सण साजरा केला जातो. याला चैत्र शुक्लादी असंही म्हटलं जातं.

महाराष्ट्रात गुढी पाडव्या निमित्त 19 मार्च रोजी सुट्टी

महाराष्ट्र शासन वर्ष सुरु होण्यापूर्वी सार्वजनिक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करत असते. त्यानुसार महाराष्ट्रात  19 मार्च 2026 रोजी सरकारने गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी (Gudi Padwa Public Holiday) जाहीर केलेली आहे. यादिवशी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निम शासकीय खाजगी कार्यालये हे बंद राहतील. तसंच, या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी असेल. 

तेलंगणामध्ये 19 मार्च रोजी सुट्टी

तेलंगना सरकारने 2026 सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार, तेलंगनामध्ये 19 मार्च 2026, गुरुवार रोजी उगादी' (चैत्र शुक्लादी) ही राज्यस्तरीय राजपत्रित सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. तेलुगू नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या या दिवशी, राज्य सरकारी कार्यालये, बँका, शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

आंध्र प्रदेशात UGADI निमित्त सुट्टी

    आंध्र प्रदेश सरकारने 2026 सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार 19 मार्च 2026, गुरुवार रोजी उगादी निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. 19 मार्च 2026, गुरुवार रोजी आंध्र प्रदेशमध्ये 'उगादी' (चैत्र शुक्लादी) ही राज्यस्तरीय राजपत्रित सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. तेलुगू नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या या दिवशी, राज्य सरकारी कार्यालये, बँका, शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.