जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेला सण-उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी दिल्या जातात. मार्च महिन्यात नुकतेच होळी झाली आहे. आता गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सण येत आहे. यादिवशीही म्हणजेच 19 मार्च 2026 रोजी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. 

19 मार्च गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी (Public Holiday on Gudi Padwa)

महाराष्ट्र शासन वर्ष सुरु होण्यापूर्वी सार्वजनिक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करत असते. त्यानुसार महाराष्ट्रात  19 मार्च 2026 रोजी सरकारने गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी (Gudi Padwa Public Holiday) जाहीर केलेली आहे. यादिवशी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निम शासकीय खाजगी कार्यालये हे बंद राहतील. तसंच, या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी असेल. 

19 मार्च रोजी बँकांना सुट्टी 

19 मार्च 2026 रोजी सरकारने गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे सर्व बँकादेखील बंद राहणार आहेत. त्यामुळे आपले आर्थिक नियोजन त्यापूर्वी तुम्ही करू शकता. 

मार्च महिन्यातील सुट्ट्या (March Month Holiday List) 

    मार्च महिन्यात आता गुढीपाडवा 19 मार्च, रमझान ईद 21 मार्च, रामनवमी 26 मार्च आणि महावीर जयंती 31 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. 

    2026 मधील उरलेल्या सार्वजनिक सुट्ट्या (Maharashtra Government Holiday 2026 List)

    • गुढीपाडवा - 19 मार्च 2026, गुरुवार
    • रमझान ईद - 21 मार्च 2026, शनिवार
    • रामनवमी - 26 मार्च 2026, गुरुवार
    • महावीर जयंती - 31 मार्च 2026, मंगळवार
    • गुड फ्रायडे - 3 एप्रिल 2026, शुक्रवार
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल 2026, मंगळवार
    •  महाराष्ट्र दिन - 1 मे 2026, शुक्रवार
    • बुद्ध पौर्णिमा - 1 मे 2026, शुक्रवार
    • बकरी ईद - 28 मे 2026, गुरुवार
    • मोहरम - 26 जून 2026, शुक्रवार
    • स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार
    • पारशी नववर्ष दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार
    • ईद ए मिलाद - 26 ऑगस्ट 2026,बुधवार
    • गणेश चतुर्थी - 14 सप्टेंबर 2026, सोमवार
    • महात्मा गांधी जयंती - 2 ऑक्टोबर, 2026 शुक्रवार
    • दसरा - 20 ऑक्टोबर 2026,मंगळवार
    • दिवाळी (लक्ष्मीपूजन) - 8 नोव्हेंबर 2026, रविवार
    • दिवाळी (बलिप्रतिपदा) - 10 नोव्हेंबर 2026, मंगळवार
    • गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर 2026, मंगळवार
    • ख्रिसमस - 25 डिसेंबर 2026, शुक्रवार

    भाऊबीजेची अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी 

    राज्य सरकारने भाऊबीजेला म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.