जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain Update: राज्यात मागील महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या तोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावला गेला आहे. यातच आता हवामान विभागाने आणखी एक चिंताजनक बातमी दिली आहे. दिवाळी पर्व सुरु झाले आहे. तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही आहे.
पावसाचा अलर्ट जारी
हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. शेतकऱ्यांची पिके काढणीला आले आहेत. काही ठिकाणी काढणी सुरु आहे. अतिवृष्टीमुळे आधीच मोठे नुकसान झाले आहेत. त्यातच आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
पुढील चार दिवसांची पावसाची स्थिती
- कोकणात आजपासून पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- मराठवाड्यात आज उद्या आणि सोमवारी पावसाची थोडीशी उघडीप आहे. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि पाढव्याच्या दिवशी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
19 आणि 20 रोजी कसे असेल हवामान
- 19 ऑक्टोबर - रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट,
- 20 ऑक्टोबर - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट,
31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर
काही दिवसांपूर्वी, राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये पिकांचे नुकसान, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान, मातीची धूप, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, दुष्काळी परिस्थितीत सामान्यतः देण्यात येणाऱ्या सवलती, रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च, सानुग्रह अनुदान, घरे, दुकाने आणि गोठ्यांचे नुकसान यांचा समावेश होता.