जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. येत्या 5 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

मुंबईत ऑरेंज अलर्ट (Heavy Rain Alert in Mumbai)

यातच आता हवामान विभागाने आज राज्यात येलो अलर्ट जाहीर केला आहे. यातच आता आजही हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टही दिला आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी 

  • येलो अलर्ट - पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,
  • ऑरेंज अलर्ट - ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे-घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, नांदेड, लातूर, धाराशीव,

हेही वाचा - Marathwada Rain Update: मराठवाड्यातील ‘त्या’ कुटुंबियांना दिलासा, प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर