जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. पिकांचे मोठे नुकसान, जनावरांचा मृत्यू आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.
महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत
महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच जनावरांच्या नुकसानीबाबतही सरकारने तातडीचे निर्णय घेतले आहेत. मृत जनावरांसाठी 37 हजार रुपये, तर मेंढी व शेळींसाठी 4 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आहेत.
नागरिकांना तातडीने मदत
“निधी उपलब्ध आहे की नाही याचा विचार करू नका. गरज पडल्यास उणे बजेटमधून तरतूद करा, पण शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे.” असे फडणवीस म्हणाले.
यासोबतच पंचनामे जलदगतीने पूर्ण करून मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. यामुळे मदत वाटपात होणारा विलंब टाळला जाईल.
अशी मिळणार मदत?
- महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये मदत
- मृत जनावरांसाठी 37 हजार तर मेंढी-शेळीसाठी 4 हजार रुपये मद
- निधी कमी पडल्यास उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश
- पंचनामे पूर्ण होताच मदत थेट खात्यात जमा होणार
- मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
- सरकारच्या या निर्णयामुळे महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: चिंता वाढली! पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पाहा तुमच्या भागातील हवामान