जेएनएन, मुंंबई. Mubmai Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आज  काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदार हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले होते. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना आभाळाकडे डोळे लावण्याची वेळ आली होती. राज्यात पेरण्या झाल्या, पीक उगवून आलं मात्र ऐन वेळी पाऊस गायब झाल्याने सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा लागून होती. काल अनेक भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत. आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 

मुंबईत पावसाची शक्यता (Mumbai Weather Update)

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. शहर आणि उपनगरांमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 25 अंशसेल्सि असे राहण्याची शक्यता आहे.  

आजचा हवामानाचा अंदाज (Weather Update 16 July)

    • या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट - पुणे, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, धाराशीव, 
    • या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव,  नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर,  पुणे घाट, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर,

    हेही वाचा - ST Fare Hike: एसटीची उन्हाळी हंगामातील भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम; ‘या’ कारणामुळे महामंडळाचा निर्णय