जेएनएन, मुंबई: मुंबईसह कोकण किनारपट्टी व घाटमाथा भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर, पुणे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. राज्यात अनेक भागातील शेतात पुन्हा पाणी भरले आहे.यामुळे शेतीतील पिके सडायला लागली आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे. 

मुंबईची स्थिती!
राजधानी मुंबईत संपूर्ण रात्र पावसाने दमछाक केली. दादर, सायन, अंधेरी, कुर्ला, चेंबूर या भागात रस्ते पाण्याखाली गेले असून लोकल ट्रेन वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी BEST बस मार्ग बदलण्यात आले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे सकाळच्या ऑफिस व शाळा-काॅलेज प्रवासात नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोकणात पाणीपातळी वाढली!
कोकण किनारपट्टीवर झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. महाड, पोलादपूर, चिपळूण, दापोली भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून अनेक घरांना पाणी शिरले आहे. कोकण रेल्वेच्या काही भागांतही पावसामुळे धावपळ निर्माण झाली आहे.

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस!
सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. वारणा, पंचगंगा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने निचांकी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

प्रशासन सतर्क!
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे की, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. निचांकी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच गरज असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एनडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

विदर्भाची स्थिती!
विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे.यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे.तर शेतात पाण्याचे तळे साचले आहे.

हेही वाचा: Nagpur Solar Explosive Blast : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, एक जण ठार तर 17 जखमी; परिसरात प्रचंड धुराचे लोट