जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आमदारची महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे लॉबिंग सुरू केली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांना दारातूनच परतवं लागलं!
एकनाथ शिंदे गटांचे तीन आमदार अजित पवार यांच्या भेटीसाठी निघाले खरे मात्र अजित पवार यांनी त्या तीनही आमदारला भेट नाकारली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराला अजित पवार यांच्या कार्यालयाच्या दारातूनच परत यावे लागले. शिंदे गटाच्या आमदाराने रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पद शिवसेनाला मिळावं, यासाठी अजित पवार यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र भेटी शिवाय शिंदे गटाच्या आमदाराला दारातूनच परत यावं लागले.
पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे व भरत गोगावले यांच्यात विभागून देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Raigad politics)
शिवसेना आमदारकडून लॉबिंग?
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आणि सहपालकमंत्री विभागून देण्यावर चर्चा सुरू आहे. कोकणात शिवसेना पक्ष शिंदे गटाची मोठी ताकद असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला पाहिजे अशी जोरदार लॉबिंग शिवसेना आमदारकडून केली जात आहे.
तीनही आमदारांना भेट नाकारली!
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमदार आणि मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींसह अजितदादांची भेटीसाठी प्रयत्न केला होता. मात्र या तीनही आमदारांना भेट नाकारली असल्याची माहिती आहे.