जेएनएन, भंडारा Maharashtra Political News: येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदात मोठा बदल केला आहे.
यांचे जिल्हे बदलले
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे आता भंडारा जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे.
सावकारेंची विनंती मान्य
भंडारा ते जळगावचे अंतर जास्त असल्यामुळे कारभार प्रभावीपणे पाहणे कठीण होत असल्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे मंत्री संजय सावकारे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. सावकारे यांची विनंती मान्य करत शासनाने हा बदल केला.
नाशिकचे पालकमंत्रिपद अजूनही रिक्त
महायूती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजूनही ठरले नाहीत. यामुळे मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय कल्लोळ अजूनही सुरूच आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.