जेएनएन, मुंबई. Aaditya Thackeray on BMC Garbage Tax: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेतील कारभारावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कर आकारला जाणार असून या कराचा सर्व मुंबईकरांनी कडाडून विरोध केला पाहिजे, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

देवनार डंपिंग ग्राउंडच्या स्वच्छतेसाठी निधी उभारण्याकरता

मुंबईच्या कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महानगर पालिकेने अदानी कर लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, अदानी समूहाने ताब्यात घेतलेल्या देवनार डंपिंग ग्राउंडच्या स्वच्छतेसाठी निधी उभारण्याकरता, BMC आता मुंबईकरांकडून कचरा संकलनसाठी "युजर फी" आकारणार आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

अन्यायकारक "युजर फी" लादत आहे

"एप्रिल फूल सरकार"ने BMC ला आदेश दिले आहेत की अदानी समूहाच्या देवनार डंपिंग ग्राउंडची स्वच्छता मुंबईकरांच्या पैशांनी करावी. ह्यासाठी सुमारे 3,000 कोटी रुपये खर्च येणार आहेत. तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 500 चौ. फूटपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला होता. भाजप सरकार आता ह्याच घरांवर, लहान व्यवसायांवर, दुकानांवर आणि आस्थापनांवर अन्यायकारक "युजर फी" लादत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    हेही वाचा - अनैतिक संबंध आणि 'पॉर्न' सिक्रेट! नागपूरमध्ये बायकोने नवऱ्याचा केला पर्दाफाश, व्हॉट्सॲप ठरले शस्त्र

    अन्यायकारक कराविरोधात जनआंदोलन करणार

    आम्ही हा अन्याय सहन करणार नाही! आम्ही ह्या अन्यायकारक कराविरोधात जनआंदोलन करणार आहोत, अशा इशारा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.