जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: मागील अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये तिढा निर्माण झाला होता. तो आता सुटला आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. तर रायगडच्या पालकमंत्री पदी भरत गोगावले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडचे नवे पालकमंत्री भरत गोगावले
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यात अप्रत्यक्ष स्पर्धा निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्याने रायगड जिल्ह्याला दीर्घकाळ अधिकृत पालकमंत्री मिळू शकले नव्हते. आता या वादावर तोडगा निघाला असून भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
नाशिकचे पालकमंत्री पद भाजपाकडे
महायुतीमधील नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचाही वाद सुटला आहे. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भारतीय जनता पक्षाने स्वतःकडेच ठेवले आहे. महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देणार आले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये येथील पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरु होती. मात्र, आता हा वाद थांबला आहे.

