मुंबई l Ladki Bahin Yojana Update : ऑक्टोबर महिना संपला तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयांचा हप्ता मिळाला नसल्याने हूरहूर लागली आहे. त्यातच ईकेवायसी प्रक्रिया सुरू असल्याने दिवाळी होऊनही अनेकांच्या खात्यात सप्टेंबरचा हफ्ताही जमा झालेला नाही. मात्र, लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कधी जमा होणार पैसे -
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 इतकी आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी संबंधित विभागाकडून लवकरच त्याबाबत अधिकृत अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा आहे.
त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल येत्या १५ नोव्हेंबरपूर्वीच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजारसंहिता लागण्यापूर्वीच महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित देण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट आली समोर
महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. राज्यभरातील जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लाभार्थींना हप्ता जमा करण्याची तयारी करण्यात येत आहे.
निवडणुका आणि आचारसंहिता -
राज्यातील नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात तयारी सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरपूर्वीच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच निर्माण झाली आहे.
आचारसंहितेपूर्वी योजनांची घाई?
सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता पाठवण्याचा निर्णय आचारसंहितेपूर्वी घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
