जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेचे लाभार्थी हे दोन कोटीपेक्षा अधिक महिला आहे. त्यांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी दिला जातो. सप्टेंबर महिन्याचा हफ्ता नागरिकांच्या खात्यात जमा झाला आहे. ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असतानाही अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागली आहे.
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता कधी येणार
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात इतकी आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी संबंधित विभागाकडून लवकरच त्याबाबत अधिकृत अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील महिन्यात किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देता येत नाही. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता पुढील आठ दिवसांतच लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Today's Gold Rate: अरे देवा, सोन्याचे भाव धाडकन कोसळले! जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा दर
ई-केवायसी प्रोसेस कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process)
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
- * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
- जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
- वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
- शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
सविस्तर वाचा -Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची eKYC कशी करावी? जाणून घ्या सोपी पद्धत
