जेएनएन, मुंबई. Maharashtra Din: आज महाराष्ट्र 65 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची
महाराष्ट्र दिनानिमित्त, मी राज्यातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतील लोकांमध्ये देशभक्तीची भावना आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस नेहमीच राहिले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ते बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी समाजाला नवी दिशा दिली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल. मी या राज्याच्या आणि त्याच्या लोकांच्या आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी X वर महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिवस के अवसर पर मैं सभी राज्यवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देती हूं। छत्रपति शिवाजी महाराज की इस धरती के लोगों में राष्ट्र-प्रेम की भावना और अन्याय के विरुद्ध संघर्ष करने का साहस सदा विद्यमान रहा है। महात्मा फुले, सावित्री बाई फुले और महादेव गोविंद रानाडे से…
— President of India (@rashtrapatibhvn) May 1, 2025
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देताना संदेशात म्हटले आहे:
"भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मुळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.”
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025