जेएनएन, मुंबई. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. आज (6 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी 20000 कोटी रुपये निधी आरक्षित
लाडक्या बहीण योजनेंसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना अशीच पुढे सुरु राहणार आहेत. यासाठी 20000 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला आहे.
महिलासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद,
- अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार.
- एकल महिला धोरण : सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार.
- लखपती दिदी : राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार.
- महिला बचतगटांच्या वस्तु उत्पादन, विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल
