जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget Session 2025 Update: राज्यात गुटख्यावर बंदी असताना देखील सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध आहे. असे असताना यांबाबत कठोर कारवाई होत नाही, लक्षवेधी माध्यमातून काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.
तरीही विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो
इतर राज्यात गुटखा बंदी नाही पण महाराष्ट्रात बंदी असताना मात्र गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे. गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कारवाई नाही. यामुळे सरकारचा महसूल बुडतो. हा गुटखा येतो, पोलिसांनी मनात आणले तर एक ही पुडी विकू शकत नाही पण तरीही विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो, लोकांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहचते, असं वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा - Thane Crime News: ठाण्यात घरात घुसून महिलेची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, मंगळसुत्रासह घर नेलं धुवून
गुटखा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार
यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी, गुटखा बाबत अन्न आणि प्रशासन विभाग कारवाई करण्यात येते. या विभागात फूड ऑफिसर्सची कमतरता आहे. पण दोन महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा विक्रीवरील कारवाया वाढणार. या प्रकरणी कोणताही व्यापारी, विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई करणार, असे मंत्री कदम म्हणाले.