जेएनएन, मुंबई. Maharashtra Board SSC and HSC Results Update: दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागलीय. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. .
2025 साली परीक्षा लवकर झालेल्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपले असल्याची माहिती आहे. निकालाचे काम लवकर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेचा कधी लागणार?
'साम' ने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औंदुबर उकिरडे यांनी सांगितले की, इयत्ता बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उतत्रपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील 8 दिवसात गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल. बारावीचा निकाल 13 किंवा 14 मे रोजी तर दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागला होता?
2024 मध्ये बारावीच्या परीक्षेचा निकाल हा 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष 2023-2024 बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला होता. 2023 या वर्षीच्या तुलनेत निकालात 2 टक्यांनी वाढ झाली होती. कोकण विभागाने गेल्यावर्षीही निकालात बाजी मारली होती. 97. 91 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला होता. परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. 2024 मध्ये एसएससीसाठी उत्तीर्णतेचे प्रमाण 95.81% होते. दोन्ही वर्गात मुलींनी मुलांपेक्षा जास्त कामगिरी केली होती.