Police Gallantry Award 2025 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस पदके जाहीर केली जातात. ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’ विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2025 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 1090 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 70 पोलिसांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण व सुधारात्मक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवेसाठी विविध पदकांची घोषणा करण्यात आली. यंदा एकूण 1090 पदकं जाहीर झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 70 जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पदक विजेते-

पोलिस विभाग:

शौर्य पदक: 7 पोलिस अधिकारी/कर्मचारी

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक: 3 पोलिस अधिकारी/कर्मचारी

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक: 39 पोलिस अधिकारी/कर्मचारी

    अग्निशमन दल:

    शौर्य पदक: 3 जण

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक: 5 जण

    गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवा:

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक: 5 जण

    सुधारात्मक सेवा:

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक: 8 जण

    गौरवाचा क्षण!

    ही पदकं मिळवणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत अपवादात्मक धैर्य, कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेली निष्ठा दाखवली आहे. त्यांच्या योगदानामुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे रक्षणच झाले नाही, तर नागरिकांचा विश्वासही वाढीस लागला आहे.

    राज्यासाठी अभिमान!

    महाराष्ट्रातील 70 जणांना मिळालेला हा सन्मान राज्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या पदकांमुळे त्यांच्या अथक परिश्रमांची, जीवावर उदार होऊन केलेल्या कर्तव्यपालनाची आणि जनतेसाठी असलेल्या अखंड सेवाभावाची अधिकृत दखल घेतली गेली आहे.

    हे ही वाचा - SIR Row : मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 65 लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश