जेएनएन, मुंबई: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन; तसेच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा उद्यादेखील (रविवारी, दि. 16) स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. 16) देखील सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
17 नोव्हेंबर अंतिम तारीख
नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
नगरपरिषद-पंचायत निवडणूक सविस्तर कार्यक्रम
- नामनिर्देशन दाखल - 10 नोव्हेंबर
- नामनिर्देशन अंतिम तारीख- 17 नोव्हेंबर
- छाननी - 18 नोव्हेंबर
- नामनिर्देशन वापस - 21 नोव्हेंबर
- नामनिर्देशन (अपिल) - 25 नोव्हेंबर
- निवडणूक चिन्ह - 26 नोव्हेंबर
- मतदान - 2 डिसेंबर
- मतमोजणी - 3 डिसेंबर
हेही वाचा - एकला चलो रे! महाविकास आघाडीत तणाव; काँग्रेस BMC निवडणुक स्वबळावर लढणार?
