जेएनएन, मुंबई: बिहार विधानसभा निवडणूकनंतर राज्यात महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवण्याचा तयारीत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की आगामी BMC ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहे.

अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर

कार्यकर्त्यांना “स्वतंत्र लढायचे” आहे, पण अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असेही चेन्नीथला यांनी सांगितले. आतापर्यंत मनसे (MNS) सोबत कोणतीही चर्चा किंवा युती करण्याचा प्रस्ताव नाही.  

एकला चलो रे अशी भावना 

काँग्रेसमध्ये “एकला चलो रे” अशी भावना स्पष्ट दिसत आहे, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती चेन्नीथला यांनी दिली.दरम्यान  काँग्रेसने मुंबईसाठी जुंबो कार्यकारिणीही तयार केली आहे.या टीममध्ये वर्षा गायकवाड यांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे.

नगरपरिषद-पंचायत निवडणूक सविस्तर कार्यक्रम

    • नामनिर्देशन दाखल - 10 नोव्हेंबर 
    • नामनिर्देशन अंतिम तारीख- 17 नोव्हेंबर 
    • छाननी - 18 नोव्हेंबर 
    • नामनिर्देशन वापस - 21 नोव्हेंबर 
    • नामनिर्देशन (अपिल) - 25 नोव्हेंबर 
    • निवडणूक चिन्ह - 26 नोव्हेंबर 
    • मतदान - 2 डिसेंबर 
    • मतमोजणी - 3 डिसेंबर

    हेही वाचा - IND vs SA Test:  शुभमन गिल रिटायर हर्ट, पुन्हा मैदानात उतरेल का? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट