जेएनएन, मुंबई. Maharashtra Local Body Election: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Election in Maharashtra) घ्या 31 जानेवारीच्या पूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता निवडणूक आयोग कसून कामाला लागले आहे. यातच आता निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नोंदवता येतील हरकती

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 

प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025  हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2027 रोजी जाहीर केली जाईल.

31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच इतर अनेक कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ (Local Body Election Date) मंजूर केली आहे. म्हणजेच, आता महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होणार आहे.