जेएनएन, मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (Local Body Election) औपचारिक रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 664 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

उमेदवार अर्ज दाखल करणे सुरू

राज्यात एकूण 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये सदस्यपदांसाठी तसेच थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. यासह ग्रामीण व शहरी भागांतील उमेदवार अर्ज दाखल करणे सुरू केले आहे.

निवडणूक कार्यालयांबाहेर मोठी लगबग

राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या निश्चित करण्यास गती दिली असून, अनेक ठिकाणी इच्छुकांच्या गर्दीमुळे निवडणूक कार्यालयांबाहेर मोठी लगबग पाहायला मिळाली. स्वतंत्र उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत  वाढली आहे.

2 डिसेंबर रोजी मतदान

    राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.