जेएनएन, मुंबई. maharashtra local body election 2025 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस राज्यभर दारूची सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आज मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगानं ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे. त्यामुळे 1 ते 3 डिसेंबरदरम्यान राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात दारू विक्री परवानगी असणार नाही.
निवडणुका शांततेत पार पडाव्यात, गैरप्रकारांना आळा बसावा आणि मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये, या उद्देशाने राज्यातील देशी, विदेशी दारू दुकाने, बीअर शॉप्स, बार, रेस्टॉरंटमधील दारू विक्री, तसेच हॉस्पिटॅलिटी झोनमधील मद्यविक्री संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यावर कडक लक्ष ठेवणार आहेत.
12,316 मतदान केंद्रांवर मतदान सुरू -
आज होणाऱ्या मतदानासाठी राज्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. 12,316 मतदान केंद्रांवर 62,108 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेशा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली असून राज्य पोलिस दल, स्थानिक पोलीस, SRPF आणि आवश्यक तेथे केंद्रीय दलाची मदत घेण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून विशेष गस्त वाढवली जाणार असून मद्यधुंद स्थितीत मतदान केंद्रांवर वावर टाळण्यासाठी कडक कारवाईची सूचना दिली आहे. निवडणूक काळात दारू वितरणाद्वारे मतप्रभावाचा धोका वाढतो, त्यामुळे या निर्णयाचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी उचललेल्या पावलांमुळे मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे निरीक्षण येत आहे. 3 डिसेंबरपर्यंत ड्राय डे प्रभावी राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
येथे होत आहे मतदान!
- गडचिरोली जिल्हा: आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली
- गोंदिया जिल्हा: गोंदिया, गोरेगाव (नगर पंचायत), सालेकसा (नगर पंचायत), तिरोडा
- नागपूर जिल्हा: बहादूरा (नगर पंचायत), बेसा-पिपळा (नगर पंचायत), भिवापूर (नगर पंचायत), बुटीबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्राह्मणी, कामठी, कांद्री-कन्हान (नगर पंचायत), काटोल, खापा, कोंढाळी (नगर पंचायत), मोटानगर (महानगर) पंचायत पंचायत), नरखेड, निलडोह (नगर पंचायत), पारशिवनी (नगर पंचायत), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव-तरोडी, पांढुर्णा (नगर पंचायत), गोधनी रेल्वे (नगर पंचायत), कन्हान-पिपरी, मोवाड, पंचायतन (नगर पंचायत).
- वर्धा जिल्हा: आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे, वर्धा.
- पंचायत), मंगरुळपीर, रिसोड, वाशिम
- यवतमाळ जिल्हा: आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (नगर पंचायत), नेर-नबापूर, पांढरकवडा.
- भंडारा जिल्हा: पवनी, साकोली, शेंदूरवाफा, तुमसर, भंडारा
- चंद्रपूर जिल्हा: बल्लारपूर, भद्रावती, भिसी (नगर पंचायत), ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, घुघुस, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा.
