जेएनएन, मुंबई. Local Body ElectionS: राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत बोलावली राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायचींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. १० नोव्हेंबरपासून नामांकन दाखल करता येणार आहे. निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होईल.नगरपंचायत एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल.
- ईव्हीएम द्वारेच मतदान होईल. व्हीहीपॅट नसतील.
- मतदारसंघनिहाय मतदारयाद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार.
- 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार.
मतदारांना मतदान केंद्र व यादीतील नाव शोधण्यासाठी खास अॅप. - 2 डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकाल.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.
तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता -
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या ८५ दिवसात व एकूण तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आधी जिल्हा परिषदा मग महापालिकांच्या निवडणुका -
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबर अखेरपर्यंत पार पाडल्या जाऊ शकतात. त्यानंतर महापालिका निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूका घेतल्या जातील. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेतल्या जातील. त्यासाठी डिसेंबर मध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल.
जानेवारीत महापालिका निवडणूक घेतल्या जातील.
प्रत्येक निवडणूक प्रकिया 21 दिवसात पूर्ण करण्याचे आयोगाचे नियोजन आहे. त्यानुसार नामांकन भरणे ते प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी हे 21 दिवसाचे शेड्यूल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक -
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे अनिवार्य आहे. यामध्ये राज्यातील मदत संपलेल्या 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांवर केंद्रीत झाले आहे. येत्या तीन महिन्यात धुरळा उडणार आहे.
