जेएनएन, मुंबई. Shivaji Maharaj Jayanti 2025 Updates: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (chhatrapati shivaji maharaj Jayanti 2025) आज महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2025) निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) इतिहासाचे दर्शन घडवणारे चित्रपट, नाटके, व्याख्याने आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी, रायगड, प्रतापगड यांसारख्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर शिवभक्तांची गर्दी उसळली आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा पथके, लेझीम पथके, घोडेस्वार आणि शिवकालीन पोशाख परिधान केलेले शिवभक्त सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज की जय चा निदान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धाडस आणि स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करून जनतेत राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज की जय असा निदान घुमतांना आपल्याला दिसून येत असून संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झाला आहे.
हेही वाचा - Shiv Jayanti 2025: स्वराज्याचे दुसरे शिवाजी म्हटल्या जाणाऱ्या या शूर मावळ्यांबद्दल जाणून घ्या
पंतप्रधानांनी केलं वंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
हेही वाचा - Shiv Jayanti 2025: स्वराज्यातील मावळे आणि या युद्धनीतीचा जोरावर काबीज केले छत्रपतींनी स्वराज्य
हेही वाचा - Shiv Jayanti 2025: पंतप्रधान साधणार शिवप्रेमींशी संवाद, शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे पोलिसांचे आवाहन
- 2025-02-19 18:50:42
Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी कशी मिळाली
शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी दरवर्षी जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेताना नेहमी आपल्या शिवाजी महाराजांना छत्रपती (Chhatrapati) का म्हणतात आणि छत्रपती नावाचा अर्थ काय? असा प्रश्न आपल्या मनात येत असतो. याची माहिती घेण्यासाठी मराठी जागरणने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी संवाद साधला. Chhatrapati Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी कशी मिळाली आणि छत्रपतीचा अर्थ काय? वाचा सविस्तर - 2025-02-19 18:35:54
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. - 2025-02-19 18:28:31
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: शिवसृष्टीच्या विकासासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असं त्यांनी आवाहन केलं. तसंच, शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा केली.https://twitter.com/Info_Pune/status/1892195605554106733
- 2025-02-19 14:46:04
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी - चंद्रशेखर बावनकुळे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे, असे प्रतिपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते नागपुरात बोलत होते.https://twitter.com/cbawankule/status/1892121176891088958
- 2025-02-19 14:33:39
आग्रा किल्ल्यावर गाजणार शिवाजी महाराजांची शौर्यगाथा
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आज आग्रा किल्ल्यावर गाजणार होईल. छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या दरबारातील भेट आणि त्यांच्या कैदेतून सुटण्याची त्यांची शौर्यगाथा यासह इतर महत्त्वाच्या घटना नाट्यमयरित्या सादर केल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेल्या आग्रा किल्ल्यात घुमणार शिवरायांच्या शौर्य गाथेचा निनाद, वाचा सविस्तर… - 2025-02-19 13:07:24
Shivaji Maharaj Jayanti Vasai: भव्य शोभा यात्रा
वसईत छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. "जय शिवाजी-जय भारत पदयात्रा" काढण्यात आली होती. ज्यात हजारो लोक सहभागी झाले होते. भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि परिसरात झाडे लावली.https://twitter.com/ians_india/status/1892046786019074094
- 2025-02-19 12:35:25
Sanjay Raut On Shiv Jayanti: फडणवीस, शिंदेंवर निशाणा
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही बेईमानांना माफ केले नाही आणि कधीही सूडाच्या राजकारणात सहभागी झाले नाही, असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.https://twitter.com/ians_india/status/1892099204987879820
- 2025-02-19 12:05:57
Shivaji Maharaj Jayanti 2025: नंदुरबारमध्ये घेण्यात आली स्वराज्य शपथ
नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचा भव्य प्रारंभ माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजनाने करण्यात आले, या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. यात्रेला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी “शिवराय औक्षण” व स्वराज्य शपथ घेण्यात आली.https://twitter.com/InfoNandurbar/status/1892099581774844112
- 2025-02-19 11:56:56
Shiv Jayanti Akola - अकोल्यात निघाली शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा रॅली
अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त शहरामधून जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. तर या पदयात्रेत शहरातील शालेय विद्यार्थी सह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तर या रॅलीला वसंत देसाई स्टेडियम येथून सुरुवात होऊन ही रॅली टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, सरकारी बगीचा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे. - 2025-02-19 11:00:07
Shiv Jayanti 2025: छत्रपती संभाजीनगर इथं जय शिवाजी- जय भारत पदयात्रा
छत्रपती संभाजीनगर इथं शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रा काढ क्रीडा ज्योतही मान्यवरांच्या हस्ते नेण्यात आली. पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ करण्यात आला.https://twitter.com/InfoCSNagar/status/1892077975342022879
- 2025-02-19 10:41:51
Shiv Jayanti 2025 Shivneri: शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्मोत्सव संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त पाळण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची दोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हलवली.https://twitter.com/Info_Pune/status/1892067397965582563
- 2025-02-19 10:36:44
Shivaji Maharaj Povade: शिवाजी महाराजांवरील पोवाडे
19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. देशभरात ठिकठिकाणी शिव जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मिरवणूका काढल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आपण त्यांच्या शोर्याची गाथा सांगणाऱ्या पोवाड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. महाराजांची कीर्ती सांगणारे हे पोवाडे एकूण तुम्ही देखील शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू शकता. Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारे हे पोवाडे तुम्ही ऐकलेत का ? - 2025-02-19 10:30:00
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Ahilya nagar: 'जय छत्रपती शिवाजी जय भारत' पदयात्रा संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे 'जय छत्रपती शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि सालीमठ यांच्या हस्ते शिव प्रतिमेला अभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजन्माचा पाळणा सादर करण्यात आला.https://twitter.com/InfoAhilyanagar/status/1892071404952006852
- 2025-02-19 10:24:40
Chhatrapati Shivaji Maharaj: ठाण्यात पदयात्रा संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” ठाणे शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) हरिश्चंद्र पाटील,जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी,विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.https://twitter.com/Info_Thane1/status/1892073293894533587
- 2025-02-19 09:27:28
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रम सुरु
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव'कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे.https://twitter.com/CMOMaharashtra/status/1892059113401757832
- 2025-02-19 09:17:57
Shiv Jayanti 2025: राज्यपालांनी वाहिली पुष्पांजली
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.https://twitter.com/PTI_News/status/1892056551394832578
- 2025-02-19 09:09:39
Shivaji Maharaj Jayanti: पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.असं मराठीत ट्वीट करुन पंतप्रधानांनी शिवाजी महाराज यांना वंदन केलं आहे.https://twitter.com/narendramodi/status/1892053183679054187
- 2025-02-19 07:41:45
Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.https://twitter.com/PTI_News/status/1892033659189989698
- 2025-02-19 07:34:30
Shivaji Maharaj Jayanti: मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त समाज माध्यमावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! असं म्हटलं त्यांनी X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसंच, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, युगप्रवर्तक, महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, आमचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1892026726106136849
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1892029861398708556
- 2025-02-19 07:25:56
Shivaji Maharaj Jayanti 2025: अजित पवार यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना केलं वंदन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहिली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले आहे.https://twitter.com/MahaDGIPR/status/1892023798410482095
- 2025-02-19 06:46:15
Shivaji Maharaj Jayanti Status: शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा संदेश
शिवजयंती दरम्यान एकता, सद्गुणी नेतृत्व आणि स्वतःची संस्कृती आणि वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. शिवाजी महाराजांच्या शाश्वत वारशाबद्दल अभिमान आणि कृतज्ञता निर्माण करणे; हे इतरांना त्यांच्या जीवनात त्याच्या शौर्याचे आणि नीतिमत्तेचे अनुकरण करण्यास प्रेरित करते. तर, आम्ही येथे सर्व शुभेच्छा, संदेश आणि कोट्स तयार केले आहेत जे तुम्ही या खास दिवशी तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासह आणि प्रियजनांसोबत शेअर करू शकता. Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या संदेशांनी द्या आपल्या प्रियजनांना शुभेच्छा - 2025-02-19 06:42:03
Shiv Jayanti 2025 Mumbai: चेंबूर इथे मध्यरात्री शिवजयंती साजरी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत चेंबूर इथे मध्यरात्री शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.https://twitter.com/mieknathshinde/status/1891938520765219128
- 2025-02-19 06:29:02
Shiv Jayanti 2025 Badlapur: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्या'चे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्या'चे अनावरण करण्यात आले.https://twitter.com/CMOMaharashtra/status/1891824247808589930
Shiv Jayanti 2025: बदलापुरात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - 2025-02-19 06:22:29
Shiv Jayanti 2025 Nashik: शहरात 3000 पोलिस कर्मचारी तैनात
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या तयारीबद्दल नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली. ते म्हणाले. नाशिक शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. काल संध्याकाळपासून पोलिस प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केली आहे, सुमारे 3000 पोलिस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, क्यूआरटी, दंगल नियंत्रण पलटण, होमगार्ड आणि आमचे वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.https://twitter.com/ANI/status/1891913657170395173
- 2025-02-19 06:14:45
Shivaji Maharaj Jayanti: जुन्नरमध्ये मध्यरात्री शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त उत्सवाच्या सुरुवातीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/ANI/status/1891982311656390696
# - 2025-02-19 06:09:50
Shiv Janyanti 2025 Junnar: जुन्नर सजले
आज होणाऱ्या 395 व्या शिवाजी जयंती सोहळ्यापूर्वी जुन्नर शहर पूर्णपणे सजवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या उत्सवात सहभागी होणार आहेत.https://twitter.com/ANI/status/1891935307945345138