जेएनएन, मुंबई: महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी देण्यात येतो.यावेळी राज्य सरकारकडून ओवाळणी म्हणून जुलै महिन्यातील ₹1500 रक्षाबंधन आधीच थेट खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राखीच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे अशी माहितीमहिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे बहिणींना राखीच्या सणाआधीच ही रक्कम मिळणार आहे.
राज्य सरकारने जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण 2984 कोटी रुपये वितरित करण्यासाठी निधी वर्ग केला आहे. या योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्यात येणार आहे.
महायुती सरकारने या योजनेसाठी एकूण 28290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी जुलै महिन्यासाठी 2984 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा:Maharashtra News: यवत येथील परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अजित पवार यांचे आवाहन!