जेएनएन, मुंबई. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Latest News) ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळतात. मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्यात लाभार्थांना लाभ मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (March April installment Coming)
मार्च एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी मंजूर
वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेसाठी या लेखाशिर्षाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च, 2026 करिता रू. 365 कोटी व माहे एप्रिल, 2026 करिता रू. 365 कोटी असा एकूण रू. 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये
मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. सरकारने 730.5100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500-1500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, हे हप्ते एकत्र येऊ शकतात किंवा वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही सूचना नाही.

हेही वाचा - Ladki Bahin Yojana: ‘ई- KYC बाबत कोणतीही नवीन संधी नाही, कार्यालयात जाऊ नका’; अधिकाऱ्यांचे आवाहन
