जेएनएन, मुंबई. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Latest News) ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून लाभार्थांना पैसे मिळाले नाहीत. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

टप्प्याटप्प्याने जमा होणार पैसे 

ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे, अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत  संबंधित महिलांनी जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी, अशी माहिती नंदुरबार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

नवीन e-KYC साठी संधी नाही

सध्या प्रसार माध्यमांमध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत लाडक्या बहिणींना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरत आहे. ज्या महिला ऑनलाईन पद्धतीद्वारे किंवा योग्य कागदपत्रांभावी ई-केवायसी (e-KYC) करू शकल्या नाहीत, त्यांना आता ऑनलाईन ऐवजी थेट जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा सरकारने दिली आहे, असा दावा या बातम्यांमधून केला जात आहे. सदर बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन राज्यातील नागरिकांना शासनस्तरावरुन करण्यात आले आहे. 

नवीन e-KYC साठी संधी नाही: ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 या मुदतीपर्यंत आपल्या अर्जाची ई-केवायसी (e-KYC) केलेली नाही, अशा महिलांसाठी सद्यस्थितीत ई-केवायसी (e-KYC) करण्याची कोणतीही नवीन संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

    सविस्तर वाचा - Ladki Bahin Yojana: ‘ई- KYC बाबत कोणतीही नवीन संधी नाही, कार्यालयात जाऊ नका’; अधिकाऱ्यांचे आवाहन