जेएनएन, नवी दिल्ली. Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहिण योजना जून महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार सुरुवात झाली आहे. शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. लाडकी बहिण योजनेच्या जून महिन्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील 2.47 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 1500 रुपये जमा होत आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर तुम्ही पुढील पद्धतीने त्याची पडताळणी करु शकतात. लाडकी बहिण योजनेतून आपल्या खात्यात पैसे आले असतील तर ते कसे तपासयाचे याची माहिती आपण जाणून घेऊया. (How to check Ladki Bahin Yojana installment has been deposited in bank account)
खात्यात दीड हजार रुपये जमा झाले की नाही असे तपासा.. (How to check Ladki Bahin Yojana Installment)
- नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा.
सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास बनवण्यात आले आहे.
- लॉगिन कसे करावे:
अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून अॅपमध्ये लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि "लाडकी बहीण योजना" पर्याय निवडा.
- मंजूर यादी तपासणी:
अॅपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
बँक खात्यात पैसे आले की नाही? कसं तपासायचं (how to check Ladki Bahin Account)
- लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून संदेश येईल.
- बँकेकडून संदेश न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर संदेश पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
- तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
- डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
- तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता
पोर्टलवर तपासणी कशी करायची?
अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि "मंजूर यादी" विभागात जा आणि तपासा.
आवश्यक माहिती टाका:
दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
स्थिती तपासा:
अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
ऑफलाइन पर्याय:
जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते. .
लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria)
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: खुशखबर..लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून खात्यात होणार जमा; 3600 कोटी रुपये मंजूर