जेएनएन, मुंबई, Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब महिलांसाठी खास तयार करण्यात आली असली, तरी या योजनेत तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या 'लाडक्या भावांनी' मिळून सुमारे 21 कोटी 44 लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आता या गैरवर्तनाविरोधात कारवाई करणार आहे.
पैसे परत न भरल्यास कारवाई
सरकारकडून या पुरुष लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, एक महिन्यात पैसे परत न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतला लाभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही पुरुषांनी खोट्या कागदपत्रांच्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले.
नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू
योजना राबवणाऱ्या यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण यादी तयार करून नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही
राज्य सरकारने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत योजना पारदर्शक ठेवण्याचा निर्धार केला आहे. दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे ही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रमुख मुद्दे!
- 14,000 हून अधिक पुरुषांनी घेतला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ!
- 21.44 कोटी रुपयांचा अपहार!
- शासनाने नोटिसा बजावल्या!
- एक महिन्यात परतफेड न झाल्यास फौजदारी कारवाईचा इशारा!
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनचे गिफ्ट! जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी होणार खात्यात जमा