एजन्सी, मुंबई. Kunal Kamra Row Update: विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या विधानावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळात, शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे.

उद्धव म्हणाले की, "मला वाटत नाही की कुणाल कामराने काही चुकीचे म्हटले आहे. कुणाल कामराने काहीही चुकीचे केलेले नाही. जो गद्दार आहे... तो गद्दार आहे. हे कोणावरही हल्ला करण्याबद्दल नाही. तुम्ही संपूर्ण गाणे ऐका आणि इतरांनाही ऐकवा... या हल्ल्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. हे 'गद्दार सेनेने' केले आहे... ज्यांच्या रक्तात 'गद्दारी' आहे ते कधीही शिवसैनिक असू शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपूर दंगलींचा कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. यावर, "सर्वत्र समान न्याय द्या, दंगली भडकवणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई कराल?" असा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा सवाल केला आहे.

हेही वाचा - Kunal Kamra Row: कुणाल कामराच्या क्लबची तोडफोड करणाऱ्या शिवसेना कार्यकर्ता राहुल कानलला अटक 

दरम्यान, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने अपमानित करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो. अशा गोष्टी सहन केल्या जाऊ शकत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड 

    कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कामरा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

     गुन्हा दाखल

    तसंच, मुंबई पोलिसांनी सोमवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.