जेएनएन, मुंबई. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथीत टिप्पणीमुळे येथे कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड 

विनोदवीर कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कामरा यांच्या विनोदांवरून राजकीय वाद निर्माण झाला असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कामरा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा - Nagpur Violence Updates: शहरात संचारबंदी पूर्णपणे उठवली, हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून केली जाईल वसूल

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    हॅबिटॅट कॉमेडी क्लबची कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर येथे तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी कामरा यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

    हेही वाचा - Kunal Kamra ने शिंदेंना असं काय म्हटलं, ज्यामुळे मोठा वाद झाला; आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, वाचा सविस्तर!