जेएनएन, मुंबई. Devendra Fadnavis On Kunal Kamra Row: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने कथीत वादग्रस्त गाणे गायल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड केली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा वादावर प्रतिक्रिया दिली.

आम्ही याचा निषेध करतो

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने अपमानित करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो. अशा गोष्टी सहन केल्या जाऊ शकत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला तर ते सहन केले जाणार नाही 

कामरा यांना हे माहित असले पाहिजे की 2024 च्या निवडणुकीत जनतेने हे स्पष्ट केले होते की कोण देशद्रोही आहे आणि कोण नाही. तुम्हाला विनोद करण्याचा, आमच्यावर व्यंग करण्याचा अधिकार आहे, तथापि, जर अशा मोठ्या नेत्यांना जाणूनबुजून अपमानित करण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला तर ते सहन केले जाणार नाही आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल. असं ते म्हणाले.

    हेही वाचा - Kunal Kamra row: शिवसेना कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, पाहा Video 

    हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड 

    विनोदवीर कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कामरा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

     गुन्हा दाखल

    मुंबई पोलिसांनी सोमवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.