जेएनएन/एजन्सी, मुंबई. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात 'गद्दार' मारणाऱ्या कुणाल कामरा यांच्या खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्टुडिओमधील तोडफोडीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर 11 जणांना अटक केली आहे, असं एका पोलिसांनी सांगितलं आहे.

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित 'गद्दार' टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. या टिप्पणीनंतर संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी राहुल कनाल यांच्यासह कार्यकर्त्यांनी कामरा यांनी कार्यक्रम केलेल्या ठिकाणी तोडफोड केली, असा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी कनाल सह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

कामरा याच्या विनोदांवरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि त्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला.  पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत, कनालसह कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने कथीत वादग्रस्त गाणे गायल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा वादावर प्रतिक्रिया दिली. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने अपमानित करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो. अशा गोष्टी सहन केल्या जाऊ शकत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड 

    कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कामरा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

     गुन्हा दाखल

    तसंच, मुंबई पोलिसांनी सोमवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.