पीटीआय, नागपूर. Nagpur Violence Update: औरंगजेबाची कबर हटवल्याबद्दल नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनांना अचानक हिंसक वळण लागले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे. आज फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानवर नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
नागपूर शहरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 100 हून अधिक लोकांमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) नेते फहीम खान यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान यांना नोटीस बजावली होती.
#WATCH | Maharashtra: House of Nagpur violence accused Faheem Khan being demolished in Nagpur. Police personnel are present at the spot. pic.twitter.com/RKzAFCokED
— ANI (@ANI) March 24, 2025
घर पत्नीच्या नावावर नोंदणीकृत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा नगर परिसरातील संजय बाग कॉलनीतील हे घर फहीम खान यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. एमडीपी शहर प्रमुख फहीम खान सध्या तुरुंगात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) ने केलेल्या निदर्शनादरम्यान धार्मिक शिलालेख असलेली एक पत्रक जाळल्याची अफवा पसरल्यानंतर 17 मार्च रोजी हिंसाचार उसळला होता.
नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचे घर नागपुरात पाडण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत.
"...आम्हाला तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही योग्य चौकशी केली. एमआरटीपी कायद्याच्या (महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदा, 1966) कलम 53(1) नुसार 24 तासांसाठी नोटीस बजावण्यात आली होती. कालावधी पूर्ण होताच, ही कारवाई करण्यात आली...,", नागपूर महानगरपालिकेचे डेपुई अभियंता सुनील गजभिये यांनी सांगितलं.
#WATCH | Nagpur: "...We had the order to investigate into a complaint. We did a proper investigation. As per Sec 53(1) of the MRTP Act (Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) a notice was issued for 24 hours. As soon as the duration completed, this action was… https://t.co/9eEE1GJsAm pic.twitter.com/6edPdYfegh
— ANI (@ANI) March 24, 2025