जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा खूप तिव्र झाल्या आहेत. विशेषतः विदर्भात सुर्य आग ओकत आहे. या भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अकोला, यवतमाळ आणि अमरावती येथे सर्वाधिक (46.9) तापमानाची नोंद दिसून येत आहे.

या जिल्ह्यात तापमान पोहोचले 46 अंशांच्यावर

राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांत तापमान हे 46 अंशांच्यावर पोहोचले आहे. यामध्ये अकोला (46.9), अमरावती (46.8), नागपूर (45.4) आणि यवतमाळ (46.0) जिल्ह्यांचा समावेश आहे.  

या जिल्ह्यांच्या तापमानात वाढ

हिटवेवची कारण काय?

    राज्यावर अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे आकाश स्वच्छ असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे.  

    शहरतापमान
    अकोला46.9
    अमरावती 46.8
    भंडारा44.0
    बुलडाणा43.2
    ब्रह्मपुरी44.2
    चंद्रपूर45.0
    गडचिरोली 44.6
    गोंदिया44.4
    नागपूर44.2
    वर्धा45.5
    वाशिम44.6
    यवतमाळ46.0