जेएनएन, मुंबई. Latur Heatstroke: महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात वसलेल्या गोंद्री गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कमी उंचीचे छत असलेल्या आणि पत्र्याच्या एका घरात, पाळण्यात विश्रांती घेत असताना नऊ महिन्यांच्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आई होती कामात व्यस्त

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी बाळाची आई कामात व्यस्त होती; त्यामुळेच तिने त्या चिमुकलीला पाळण्यात झोपवले होते. याच दरम्यान, प्रचंड उष्णता आणि दमटपणामुळे त्या बाळाचा घसा कोरडा पडला आणि त्यानंतर तिची जीभ टाळूला चिकटल्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

शिया नेताजी गोरे असे मयत 8 महिने 9 दिवसांच्या चिमुकलीचे नाव आहे. मयत चिमुकली ही निलंगा तालुक्यातील तुपडी येथील आहे. तिची आई बाळंतपणासाठी माहेरी गोंद्रीत येथे आली होती. काही दिवसांपासून ही चिमुकली आजारी होती. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उष्माघाताने बालिकेचा मृत्यू !

माहेरचे घर पत्र्याचे असल्याने 19 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी उष्णतेमुळे घरातील पाळण्यात झोपलेली बालिका उठली नाही. उष्माघाताने बालिकेचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

    या घटनेची माहिती मिळताच तालुकास्तरीय आरोग्य पथक शनिवारी गावात दाखल झाले. प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्या चिमुकलीचा मृत्यू कशामुळे झाला, हे वैद्यकीय अहवालानंतर समजणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एस. देवणीकर यांनी सांगितले.