जेएनएन, मुंबई. Weather Update Todays: राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा खूप तिव्र झाल्या आहेत. विशेषतः विदर्भात सुर्य आग ओकत आहे. या भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अमरावती आणि अकोला येथे सर्वाधिक (45.6) तापमानाची नोंद दिसून येत आहे. तर, दुसरीकडे पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
मुसळधार पावसाचा येलो अलर्ट
पुणे, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अलर्ट देण्यात आलेली जिल्हे…
काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण
- ठाणे, मुंबई, रायगड, रत्त्नागिरी,
पावसाचा येलो अलर्ट
- पुणे, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर,
उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट
- अकोला, अमरावती, वर्धा,

या जिल्ह्यात तापमान पोहोचले 45 अंशांच्यावर
राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांत तापमान हे 45 अंशांच्यावर पोहोचले आहे. यामध्ये अकोला (45.6), अमरावती (45.6), नागपूर (44.2), वर्धा (45.5) जिल्ह्यांचा समावेश आहे.
