जेएनएन, मुंबई: राज्यभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25 हजार रुपये भांडवली अनुदान देणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.25,000/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज आजपासून ऑगस्ट ते 6 सप्टेंबर, 2025 या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
हेही वाचा: Maharashtra News: मराठा समाजाला आरक्षणसाठी उपसमितीचं पुनर्गठन ; राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्षपद