जेएनएन, मुंबई: दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाचा समारोप होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविक आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत.
मुंबईत विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 21 हजार पोलीस दल, एआय तंत्रज्ञान आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून देखरेख ठेवली जात आहे. तसेच 84 रस्ते पूर्णपणे बंद, 88 रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण तर 54 रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. 4,000 हून अधिक वाहतूक पोलीस तैनात असून 16 प्रमुख विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत सुमारे 6,500 मंडळांचे व दीड लाख घरगुती गणपती विसर्जनासाठी रवाना झाले आहेत. उच्च सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला आहे.
पुण्यातही विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी यांसारख्या मानाच्या गणपतींसह शहरातील इतर मंडळांच्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने निघत आहे. ढोल-ताशांचा गजर, झांज-लेझीम पथक आणि पारंपरिक सजावट यामुळे पुण्याचे विसर्जन सोहळे अधिक रंगतदार होत आहेत. दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन पार पाडले जाणार आहे
मुंबई आणि पुण्यातील विसर्जन सोहळ्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचा वातावरण आहे.
हेही वाचा:Anant Chaturdashi 2025 : गणेश विसर्जनासाठी मुंबईत 21 हजार पोलीस कर्मचारी, 10 हजार सीसीटीव्ही, ड्रोन व पहिल्यांदाच AI चा वापर!