जेएनएन, मुंबई. Ganeshotsav 2025: गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गणपती पावला अजून मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. गणेश उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 44 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. गणेश उत्सव काळात 296 विशेष गाड्या प्रवाशांच्या सेवेत लवकरच धावणार आहेत. हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशोत्सवात गावी जात असल्यामुळे त्यांच्यासाठी 296 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेंमुळे त्याचा प्रवास सुखकारक होणार आहे.

कधी धावणार अतिरिक्त विशेष गाड्या -

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोडदरम्यान आठ द्विसाप्ताहिक विशेष गाड्या धावतील.
  • या गाड्या 28 आणि 31 ऑगस्ट तसेच 4 आणि 7 सप्टेंबर रोजी सुटतील.
  • एलटीटी–सावंतवाडी विशेष (क्र. 01131) सकाळी 8:45 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 10:20 वाजता गंतव्यस्थानी पोहोचेल.
  • परतीची सावंतवाडी–एलटीटी विशेष (क्र. 01132) रात्री 11:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता एलटीटीला पोहोचेल.

कुठे असतील थांबे -

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग अशा कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबतील.